उरळीकांचन, दि.७ मे २०२० : महाराष्ट्रात आज कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. या जाणीवेतून तरडे येथील एका शेतकरी कुटुंबातील वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व ह. भ. प. प्रकाश बबनराव काळे, यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पन्नास हजार रुपयांचा धनादेश आमदार अशोक बापू पवार व हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी तलाठी योगीराज कनीचे, ग्रामसेवक वीरकर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे , अशी माहिती असे ह.भ. प. काळे यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना दिली.
यावेळी उपस्थित भाजपा नेते काळुराम कुरकुंडे, नामदेव गडदे, शंकर पिंगळे,जि. प. मा. सदस्य लक्ष्मण केसकर, खंडू गडदे, संजय जगताप, अनिल जगताप, अमोल गाढवे, सुदाम काळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे