शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर ५०१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

माढा, १३ डिसेंबर २०२०: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टें व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून १२ डिसेंबर रोजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५०१ रक्तदात्यांनी रक्तदान केलं असल्याची माहीती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

सदर रक्तदान शिबिराचं उद्घाटन कारखान्याचे संचालक तथा जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचं पुजन करुन करण्यात आलं. तसेच दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर व कारखाना अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं.

सदर प्रसंगी विठ्ठलराव शिंदे कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर. यादव, मुख्य शेतकी अधिकारी एस.पी. थिटे, वर्क्स मॅनेजर सी.एस. भोगाडे, चिफ केमिस्ट येलपले, पी.एस. फायनान्स मॅनेजर डी.डी. लव्हटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही बागल, शेतकी अधिकारी एस.एस. बंडगर, परचेस आफिसर जे.डी. देवडकर, सिव्हील इंजिनिअर एस.आर. शिंदे, सुरक्षा अधिकारी एफ.एम. दुंगे व कर्मचारी उपस्थित होते.

सदर शिबीरामध्ये हेगडेवार ब्लड बँक-सोलापुर, रामभाई शहा ब्लड बँक बार्शी, भगवंत ब्लड बँक बार्शी, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, ब्लड बँक-अकलुज, पंढरपुर ब्लड बँक पंढरपुर इ. ब्लड बँकांनी उपस्थित राहुन रक्त संकलन केलं. सदर शिबीरामध्ये कारखान्याचे सभासद, शेतकरी, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रति वर्षी मोफत काशी यात्रा, मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, तसेच मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. सध्या कोरोना महामारी च्या पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्त रूग्ण व इतर आजारावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्यानं विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टें व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून जून महिन्यात माढा विधानसभा मतदारसंघामध्ये ठिक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करून २ हजार ५०० रक्त पिशव्यांचं संकलन करण्यात आलेलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा