अमरावती, १२ऑगस्ट २०२२: बाल आणि माता आरोग्यसंबधी शासने एवढ्या योजना राबवूनही मेळघाटात बालमृत्यू होतच आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील ५३ बालकांचा मृत्यु झाला असून १९ अर्भकांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
अंगनवाडी कार्यक्षेत्रातील सहा वर्षापर्यंतच्या बालकांचं वजन व उंची मोजून कुपोषित बालकांची नोंद करून अशा बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येते. त्यांची नियमित तपासणी व लसीकरण अशा उपाययोजना राबविण्यात येतात.
पावसाळ्यात मेळघाटातील कुपोषित बालकं, गर्भवती महिलांना बालरोग आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची सेवा देण्यासाठी नजीकच्या जिल्ह्यामधून १५ दिवसांच्या कालावधीसाठी नियुक्त्या करण्यात येतात. पण अनेक ठिकाणी हे तज्ञ पोहचत नाहीत. एक दोन दिवस येतात आणि हजेरी लावून जातात.
मेळघाटात आजही उपजात मृत्यु व बालमृत्यू अधिक आहेत. तज्ज्ञांमार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेमुळं बालमृत्यू प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. पण ती नियमित हवी, ग्रामीण रुग्णालय, समुदाय आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय हवा.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर