पिंपरी चिंचवड, २६ ऑगस्ट २०२२: पोलिस भरती परीक्षा घोटाळ्यातील ५६ जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यातील विशेष बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी ३१ जन सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरले होते.
त्यांना पोलिस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याची त्यारिदेखील झाली होती. मात्र, पोलिसांना वेळीस कुणकुण लागल्याने मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला. नाहीतर आगामी काळात त्या ३१ भामट्यांचा पोलिस दलात सहभाग झाला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे, की पिंपरी चिंचवड पोलिस दलात नोव्हेंबर २०२१ मध्ये ७२० पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. दरम्यान, भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर,या घोटाळ्यात सहा डोळ्यांतील १२१ जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी सापळे रचून ५६ अरोपिनला अटक केली. त्यांच्याकडून ७६ मोबाईल्स, ६६ इलेक्ट्रॉनिक स्पाय डिवाईस, ११लाख रुपये रोख रखम असे भले मोठे घबाड जप्त केले. तसेच आरोपिंकडून डिवाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्ड, कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहेत.या प्रकरणात आणखी ६६आरोपिंचा शोध सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड.