चोवीस तासांत ५,६०९ नवे रुग्ण तर १३२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. २१ मे २०२०: जगभरात थैमान घालणारा कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. भारतात देखील आता त्यानी कहर माजवण्यास सुरुवात केली आहे. भारतात दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली आहे. मागील चोवीस तासांत देशात तब्बल ५ हजार ६०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख १२ हजार ३५९ वर पोहचली आहे. या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले ६३ हजार ६२४ रुग्ण व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३ हजार ४३५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे.

जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी केला गेला. एक लाख लोकसंख्येमागे जगभरात ६२.३ कोरोना रुग्ण आढळले पण भारतात ही संख्या केवळ ७.९ इतकीच होती, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा