माढा, दि. २ सप्टेंबर २०२०: माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनराव शिंदे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी ९ ते दु. ४ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये कारखान्याचे युनिट नं. १ व युनिट नं. २ येथील अधिकारी व कर्मचारी, सभासद शेतकरी व कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी उस्फुर्त सहभाग नोंदवून एकुण ५६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी सोलापूर येथील गांधी फोरम या रक्तपेढीने उपस्थित राहून रक्त संकलन केले. यामध्ये युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब येथील कारखाना अधिकारी व कर्मचारी, शेतकरी व कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी उस्फुर्त सहभाग नोंदवून एकुण ५६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना या महामारीच्या पार्श्वभुमीवर आ. बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माढा मतदारसंघामध्ये ३० हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्त रूग्ण व इतर आजारावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांवटे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून माहे जून मध्ये माढा मतदारसंघामध्ये ठिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून २ हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आलेले होते. तसेच ३० सभासद शेतक-यांना हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलेले आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, पिंपळनेर चे बिभिषण डांगे, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव उपस्थित होते. चौकट- मौजे रांझणी देवाची, ता. माढा येथील दत्तात्रय भैरू जाधव (फोटोग्राफर) यांनी माढा तालुक्याचे भाग्यविधाते आ.बबनराव शिंदे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटाच्या रक्ताच्या तुटवडयामुळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ७१ व्या वेळी रक्तदान केले. त्यांनी २० वर्षांपूर्वी १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केलेला असून पुढील काही वर्षात संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
चौकट- मौजे चिंचगाव येथील आचारी सचिन परबत यांनी आ. बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्यातील सर्व कोव्हीड सेंटरला मोफत जेवण व मसाला दुधाचे वाटप केले. तसेच कारखाना कार्यस्थळावर आयोजित रक्तदान शिबीरामध्ये मसाला दूधाचे वाटप केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील