नाशिकमध्ये शहरात ‘शासन आपल्या दारी’साठी बसेसचे ५८ पिकअप पॉईंट

नाशिक, १४ जुलै २०२३: गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी, लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी शहरातील सहाही विभागांत सिटीलिंक बसेसचे ५८ पिकअप पॉईंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिटीलिंकच्या दीडशे बसेसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत सोडण्याचे काम केले जाणार आहे.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा महापालिकेच्या विविध विभागांतील लाभार्थ्यांना, सिटीलिंक बसेसच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी आणले जाणार आहे. प्रत्येक बससाठी दोन संपर्कप्रमुख असणार आहेत.

बस क्रमांकासह संपर्कप्रमुखाचे नाव तसेच मोबाईल नंबर संबंधित बसवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी मनपाने दिलेल्या पिकअप पॉईंटवर शनिवारी सकाळी ९ वाजता हजर राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा