५९ “%” भारतीयांची इच्छा,चीन-भारत युद्ध व्हावे……

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२०: चीनने कोरोना सारखी देणगी तर संपुर्ण जगाला दिली पण त्याच बरोबर तो इतर देशांशी मुजोरीपणा करतानाही दिसतोय. चीन हा आधीपासूनच एक प्रकारे पलटू आणि जगापासून सर्व माहिती लपवणारा धुर्त देश आहे. चीनने भारताला देखील अनेक वेळा दगा दिला आहे.

चीन आणि भारताचे संबध हे आलिकडच्या काळात सीमा वादामुळे ताणलेले आहेत. ज्यामध्ये चीन शेजारील देशांना बरोबर घेऊन भारताला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. तर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने देखील चीनला चोख प्रतिउत्तर देत आर्थिक कंबरडे मोडले.

तर याच सर्व पार्श्वभूमीवर चीन बद्दल भारतीयांचा मनात चीन बद्दल राग संताप किती आहे याबद्दल एका वृत्तपत्राने सर्व्है केला. “मुड ऑफ द नेशन २०२०” या नावाखाली सर्व्हेक्षण करण्यात आले आणि लोकांच्या मनातील काय भावना आहेत. त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सर्व्हेक्षणामधे काय समोर आले ते पहा….

१) यावेळी ५९% भारतीयांनी भारत आणि चीनमध्ये युद्ध व्हावं असे मत नोंदविण्यात आले.

२) ७२% भारतीयांनी तर युद्ध आपणच जिंकू असा विश्वास दर्शविला.

४) तर ३४% भारतीय हे युद्धाच्या विरोधात होते.

५) तर ७% लोक हे तटस्थ राहिले.

६) आणि ८४% भारतीयांनी तर चीन वर विश्वास ठेवू नका असे मत व्यक्त केले.

या सर्व्हेक्षण मधून भारतीय लोक हे चीन बद्दल मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोशात आहेत असे दिसून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा