यूपीमध्ये भीषण वादळ, ६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, दि. ३१ मे २०२०: आग्रा नंतर उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये वादळ व गारपिटीने बर्‍याच प्रमाणात विनाश झाला आहे. वादळामुळे तेथे ६ लोकांचा मृत्यू झाला आणि बरेच लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वात जास्त नुकसान कन्नौज जिल्ह्यातील तिरवा तहसीलमध्ये झाले आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

शनिवारी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे डझनभर झाडे, विजेचे खांब पडले आहेत, तर पोल्ट्री फार्म, डेअरी फार्म आणि गॅस एजन्सीचेही नुकसान झाले. विजेचे खांब पडल्याने डझनभराहून अधिक खेड्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. कन्नौज एसडीएमने बाधित गावात पोहोचून परिस्थिती व नुकसानीची माहिती घेतली.

तिर्वा मध्ये जोरदार वादळामुळे ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली. यामुळे ट्रॅक्टरवर बसलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा धडक लागून मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाली. उपचारादरम्यान त्याचा ही मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात एवढे भीषण वादळ कधी पाहिले नव्हते. ठठिया भागातील एका व्यक्तीच्या डोक्यावर पडलेल्या गरांमुळे त्याचा मृत्यू झाला, तर दोन ठिकाणी भिंत कोसळून दोन लोकांचा जीव गेला. तसेच एका ठिकाणी झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. या आपत्तीत २६ जनावरांचा ही मृत्यू झाला आहे. गावात पोहोचल्यावर सरकारी अधिकारी नुकसानीचे आकलन करण्यात व्यस्त आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा