वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकच्या धडकेत ६ ठार, अनेक जखमी

वडोदरा, १८ ऑक्टोबर २०२२: गुजरातमधील वडोदरा शहरातील कापुराई येथील राष्ट्रीय महामार्गावर एक लक्झरी बस व ट्रकची धडक झाली. या अपघातात सहा जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी बस महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली. अपघातग्रस्त बस ही राजस्थानवरून सुरतच्या दिशेने जात होती. महामार्गावर ट्रक हा बसच्या पुढे होता. त्या ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असताना बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात सहा जण ठार झाले तर पंधरा जण जखमी झाले असून, जखमींना स्थानिक एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मृतांमध्ये एक बालक, एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा