मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव : मुख्यमंत्री

मुंबई, ३ सप्टेंबर २०२० : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवून तिथं वनसंपदेचं संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसंच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीनं विस्तीर्ण जंगल फुलवण्याचं जगातलं हे पहिलंच उदाहरण ठरणार आहे.

याच बरोबर थंड हवेचं ठिकाण असलेले माथेरान कालपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. कोरोनाबाबतच्या दक्षतेचे सर्व नियम तिथे पाळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी २८ पर्यटकांनी इथे हजेरी लावली. पर्यटनावर पूर्णपणे अवलंबून असलेली माथेरानची अर्थव्यवस्था आत पुन्हा उभारी घेईल, अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा