चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळं दिवाळीत चीनला ६० हजार कोटींचं नुकसान

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर २०२०: दोन दिवसांवर दिवाळी सण आला आहे. तब्बल आठ महिन्यांच्या ताळे बंदीनंतर लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहे. दिवाळी म्हटले की मोठ्या प्रमाणावर रोशनाईच्या वस्तू जसे की लाईटच्या माळा, पणत्या, आकाश कंदील यासारख्या अनेक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असतात. सध्या सरकार कडून अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देखील देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहक देखील गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे तर त्यांच्या या खरेदी मुळे व्यापारी देखील खूष झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुख्य वास्तुविशारद आणि भारतीय संस्कृतीचा उपदेशक डॉ. खुशदीप बन्सल आणि उज्जैनचे आचार्य दुर्गेश तारे यांनीही सांगितले की, दिवाळीनंतर ग्रहांच्या स्थितीनुसार देशाच्या व्यवसायात मोठा सकारात्मक बदल होईल. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. बरबथैया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, दिवाळीच्या दिवशी साजरा करण्यात आलेल्या इतर उत्सवात धनतेरस १३ नोव्हेंबर, दिवाळी १४ नोव्हेंबर, गोवर्धन पूजन १५ नोव्हेंबर, भाऊबीज १६, छठ पूजा २० नोव्हेंबर आणि तुळशी विवाहसोहळा मुख्यतः २६ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास सुरू केली आहे. दिवाळीनिमित्त इतरांना भेट देण्यासाठी मिठाया, ड्रायफ्रूट्स यांसारख्या पदार्थांची देखील खरेदी होण्यास सुरुवात झाली आहे. रेडिमेड वस्त्रे, परिधान, सौंदर्यप्रसाधनं, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम फर्निशिंग, भांडी, स्वयंपाकघरातील वस्तू, विद्युत वस्तू, दुकान आणि घर फर्निचर, एफएमसीजी उत्पादने, मिठाई, घर फर्निचर, भांडी, क्रॉकरी गिफ्ट पॅक डिश आणि चॉकलेट, फळांच्या गिफ्ट बास्केट, दिवाळी पूजेच्या वस्तू, अगरबत्ती इत्यादीची मागणी गेल्या दोन दिवसांत ग्राहकांमध्ये जास्त आहे. धनतेरसनिमित्त सोनं, चांदी, भांडी आणि स्वयंपाकघरातील वस्तूंच्या व्यापा-यांना मोठा व्यवसाय अपेक्षित आहे.

तर दुसरीकडं चीन सोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर देशात सर्वत्र चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका देखील चीनला बसत आहे. दुसरीकडं व्यापारी चिनी वस्तूंची विक्री करीत नाहीत, तर ग्राहकही पूर्णपणे चिनी वस्तू खरेदी करण्यास उत्सुक नसतात.

खंडेलवाल म्हणाले की, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बाजारात सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या व्यापाराचा अंदाज आहे, त्यामध्ये चीनला वर्षाकाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. खंडेलवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. देशभरातील व्यापारी संघटनांसह राज्यांतील विविध कारागीर, हस्तकला कारागीर आणि इतर प्रमुख वस्तू उत्पादकांशी कॅटने संपर्क साधला आहे. त्यामुळे देशभरात अनेक नवीन डिझाईन्समध्ये स्वदेशी बनावटीच्या वस्तू दुकान, ऑफिस इत्यादींमध्ये विकल्या जात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा