बेळगांवमध्ये ६३ अग्निवीरांनी घेतली देश सेवेची शपथ, मराठा लाईट इन्फंट्रीत शानदार कार्यक्रमाचे आयोजन

बेळगांव, ३ ऑक्टोबर २०२३ : मराठा लाईट इन्फंट्रीत रेजिमेंटल सेंटरच्या दुसऱ्या अग्निवीर तुकडीचा शपथविधी संमारंभ आज दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात ६३ अग्निवीरांनी देश सेवेची शपथ घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर जाॅयदीप मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. मराठा रेजिमेंटल सेंटरमध्ये शरकत युद्ध स्मारकाच्या प्रांगणात अग्निवीरांनी ३१ आठवडे पूर्ण प्रक्षिशण घेतले. ६३ अग्निवीर आज शपथ घेऊन देश सेवेत दाखल झाले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जाॅयदीप मुखर्जी यांनी अग्निवरांच्या कसम परेडची पाहणी केली.

अग्निवीरांनी राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि धार्मिक पवित्र ग्रंथ यांच्या उपस्थितीत कर्तव्य, मान आणि साहस या तत्वावर सैन्यात सेवा बजावण्याची शपथ घेतली. मुखर्जी म्हणाले की, समृद्ध वारसा आणि भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या पायदळ रेजिमेंट पैकी एक म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीच्या वैभवाची आठवण करून दिली. त्यांनी सैनिकांच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व यावर भर दिला. त्यांनी रेजिमेंटल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर आत्मविश्वास व्यक्त केला.

परेड दरम्यान, प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी गुणवंत अग्निवीरांना सन्मानित केले. नाईक यशवंत घाडगे, सर्वोत्कृष्ट अग्निवारांचे व्हिक्टोरिया क्रॉस पदक हे अग्निवीर वैभव पाटील यांना प्रदान करण्यात आले. शरकत वाॅर मेमोरियल येथे रेजिमेंटच्या शूर अधिकारी आणि अग्निवीरांना अभिवादन करून परेडचा समारोप झाला.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा