पेण येथे ६४७ वी संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी

पेण, २४ फेब्रुवारी २०२४ : पेण शहरातील रोहिदास नगर येथे संत रोहिदास यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ही जयंती साजरी करत असताना सर्व नागरिकांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार देखील कऱण्यात आला. याशिवाय विवीध प्रकारचे गुणगौरव कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी संत रोहिदास सुधारक मंडळाचे अध्यक्ष भरत साळवी यांनी आपले प्रास्ताविक मांडत असताना संत रोहिदास महाराजांची महती सांगून या रोहिदास नगरच्या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेचा पेण पालिकेने विचार करावा तसेच पेण पालिकेच्या इमारतीमध्ये एखाद्या दालनाला संत रोहिदास महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली.

तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी बोलताना संत रोहिदास महाराजांनी समाजाच्या हितासाठी जे काही केले त्याला अनुसरून आज या समाजातील तरुण आणि होतकरू व्यक्ती मोठमोठ्या पदावर आणि स्तरावर पोहोचले आहेत आणि आपल्या समाजाचे नाव उंचावून हे समाजाचे काम अविरतपणे करत आहेत याचे अभिमान वाटत असल्याचे सांगत या भागासाठी भविष्यात जी काही विकासकामे करायची असतील त्यात आमचा देखील खरीचा वाटा नक्की असेल असे सांगितले. यावेळी हिंदीचे प्राध्यापक डि. के. बामणे, केशव साळवी, रश्मी गायकवाड यांसह उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांचे विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतरे आणि वाय के पाटील सर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्निल पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा