राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

पुणे, 6 डिसेंबर 2021: महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये काल आढळून त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय. यासह आता राज्यात एकूण आठ जणांना ओमायक्रॉन ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. यामुळं राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.

सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा