स्वालंबी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ७१ दिव्यांगाना मिळणार मोबाईल ई रिक्षा

रायगड, २१ फेब्रुवारी २०२४ : रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वालंबी होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ७१ लाभार्थ्यांना मोबाईल ई रिक्षा मिळणार असून यासाठी रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून २८९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावमधून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखालील अलिबाग येथील मुक बधीर शाळेतील विद्यार्थी आदर्श पुरी यांच्या हस्ते सोडत प्रकिया पूर्ण करण्यात आली.

या सोडत वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, मुख्य वित्त लेखा अधिकारी कदम, समाज कल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम तर निरीक्षक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, दिव्यांग कक्षाचे सल्लागार किशोर वेखंडे, प्रशांत काळे साईनाथ पवार आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा