हरियाणातील भूमिपुत्रांना खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी ७५ टक्के आरक्षण

चंदीगड, ३ मार्च २०२१: हरियाणातील तरुणांसाठी हरियाणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणातील भुमिपुत्रा साठी खाजगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. हरियाणातील भूमिपुत्र साठी ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याच्या विधेयकाला हरियाणाच्या राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. यासह आता खाजगी क्षेत्रात देखील हरियाणातील तरुणांना नोकरी मिळणे निश्चित आले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी याबाबतची माहिती दिली.

मनोहर लाल खट्टर यांनी दिली माहिती

“राज्यातील तरुणांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या विधेयकाला राज्यपालांनीही सहमती दर्शवली आहे. याबाबतची सूचनाही लवकरच काढली जाईल आणि विधेयक पुढे सरकवले जाईल,” असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले. राज्यपालांच्या मंजुरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल. हे विधेयक लवकरच विधानसभेत सादर केले जाणार आहे. पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या सत्रात हे विधेयक मांडले जाईल.

५० हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची ही तरतूद आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. विधेयकातील ही तरतूद खासगी कंपन्या, सोसायट्या, ट्रस्ट आणि भागीदारीतील सर्व कंपन्यांना लागू होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा