उस्मानाबाद, २२ मे २०२०: कोरोना च्या या पार्श्वभूमीवर रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणू वर नियंत्रण मिळवण्यासाठी जागोजागी काटेकोरपणे नियमांचे पालन केले जात आहे, परंतु कोरोना ची लागण असलेल्या पैकी काही रूग्णांची मृत्यू होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील आज दिनांक २२ मे रोजी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा मधील कोरोना ग्रस्त महिलेचा उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रूग्णांची एकूण संख्या १७७ असून त्यातील ६ रूग्णांची मृत्यू झाली होती तर बाकी १३२ रूग्ण हे कोरोना वर यशस्वी रित्या मात करून कोरोना मुक्त झाले. मुंबईतून आलेल्या ५५ वर्षीय महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या जिल्ह्यातील मृत रूग्णांची संख्या ही ७ वर गेलेली आहे. संबंधित महिलेला रक्तदाब तसेच मधुमेहाचा आजार असल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ३८ अॅक्टीव कोरोना ग्रस्त रूग्ण असून रूग्णालयात त्यांचा उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी आज दिली.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड