गोल पोस्ट महाराष्ट्र महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याने ८ ठार, ५ जखमी

महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याने ८ ठार, ५ जखमी

भिवंडी २१ सप्टेंबर २०२० : सोमवारी पहाटे पहाटे येथे पटेल कंपाऊंड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्यामुळे कमीतकमी आठ जणांचा बळी गेला आणि पाच जणांना वाचविण्यात आले, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

ही घटना पहाटे साडेतीन वाजता घडली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ), अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सध्या सुरू आहे. स्थानिक लोकांकडून सुमारे २० जणांना वाचविण्यात यश आले आहे, परंतु प्राथमिक माहितीनुसार २०-२५ लोक अजूनही ढिगा-या मध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे एनडीआरएफने सांगितले. पुढील तपशिलाची प्रतीक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version