विजयवाडा कोविड केअर सेंटरमध्ये भीषण आग, ८ रुग्णांचा मृत्यू

विजयवाडा (आंध्र प्रदेश), ९ ऑगस्ट २०२०: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हॉटेलमध्ये अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. हे हॉटेल एक रुग्णालय कोविड -१९ सेंटर म्हणून वापरत होते. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० जणांना वाचविण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तथापि आंध्र प्रदेशात कोरोनाचे एकूण ८४६५४ रुग्ण आहेत.

यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी गुजरातच्या अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत कोविड -१९ मधील आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सकाळी ३.३० च्या सुमारास कोविड -१९ रूग्णांच्या उपचारासाठी ओळखल्या जाणार्‍या नवरंगपूर भागातील श्रेय हॉस्पिटलमध्ये ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.  या अपघातात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल झालेल्या पाच पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला. ते म्हणाले की जवळपास ४० इतर कोविड -१९ रुग्णांना ह्या रुग्णालयातून वाचविण्यात आले आणि त्यांना शहरातील दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अहमदाबाद अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘श्रेय हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आठ कोरोना रुग्ण आगीमुळे मरण पावले. आगीवर नियंत्रण मिळवले आहे.  प्राथमिक माहितीनुसार रुग्णालयामध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  सहायक पोलिस आयुक्त एल. पी. बी. जाला म्हणाल्या,”सविस्तर तपासणीसाठी फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा