१२ सप्टेंबरपासून धावणार ८० नवीन विशेष गाड्या ; रेल्वेची घोषणा

नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२०: भारतीय रेल्वेने १२ सप्टेंबरपासून ८० नवीन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांमध्ये प्रवासासाठी १० सप्टेंबरपासून बुकिंग करता येणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी शनिवारी सांगितले की, १२ सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे ४० जोड्या विशेष गाड्या चालवणार आहे. यासाठी आरक्षण १० सप्टेंबरपासून सुरू होईल.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की या ४० जोड्या म्हणजेच ८० विशेष गाड्या पूर्वी चालविल्या जाणाऱ्या २३० गाड्यांव्यतिरिक्त चालवल्या जातील. ते म्हणाले की, राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतानुसार गाड्या चालवल्या जातील.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, ज्या विशेष गाडया चालवल्या जात आहेत त्यांचे निरीक्षण केले जाईल. जिथे जिथे ट्रेनची मागणी असेल किंवा तेथे लांबलचक प्रतीक्षा यादी असेल तेथे वास्तविक ट्रेनच्या आधी क्लोन ट्रेन चालविली जाईल.

ते म्हणाले की परीक्षा घेण्यासाठी किंवा राज्य सरकारच्या विनंतीनुसार विशेष गाड्या सोडल्या जातील. कोरोना साथीची परिस्थिती पाहता रेल्वेच्या सध्या फक्त २३० विशेष गाड्या धावत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा