Nagpur Violence : महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी सोमवारी १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून नागपूरमधील गणेशपेठेत व महाल परिसरात आंदोलन करण्यात आले होते. पण त्यानंतर दोन गटात मोठा वाद निर्माण झाला. आता या वादानंतर नागपूर पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले असून नागपुर शहरातील महाल भागात पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून ८० जणांना अटक केली आहे.
आणखी वाद न होण्यासाठी कोतवाली, गणेशपेठ,लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.महाल भागात झालेल्या वादानंतर परिसरातील इंटरनेट आणि वीज सेवा बंद करण्यात आले होते. त्यानंतर तेथील दोन्ही गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. सध्या सूत्रानुसार अशी माहिती समोर येत आहे की, आज परीसारतील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे. याचबरोबर नागपूरमध्ये कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असून सायबर पोलिसांकडून आतापर्यंत १८०० सोशल मिडिया अकाऊंटची तपासणी करण्यात आली आहे.
नेमक प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ आणि महाल परिसरात १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या कारणाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि औरंगजेबाची कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळण्यात आली होती. त्यांतर याचे काही फोटो सोशल मीडिायावर व्हायरल करण्यात आले. यानंतर एक गट आला आणि या गटाकडून हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेत परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर