पुणे, १ ऑगस्ट २०२० : पुणे जिल्हयात ८२ हजार ९२४ बाधीत रुग्ण असून त्यातील ५२ हजार ४५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २८ हजार ५४२ रुग्ण अक्टिव्ह आहे.
यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १९ हजार १७० , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ६ हजार ८२२, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील १०५ , पुणे कॅन्टोंन्मेंट १४४, खडकी विभागातील २०, ग्रामीण क्षेत्रातील २ हजार २८१ यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
जिल्हयात कोरोनाबाधित एकूण १ हजार ९३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १ हजार ३१५, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ३५०, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील ५८,
पुणे कॅन्टोंन्मेंट ३१ , खडकी विभागातील ४१, व ग्रामीण क्षेत्रातील १३७, रुग्णांचा समावेश आहे. तसेच ७३८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ६३.२५ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.३३ टक्के इतके आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ३ हजार ८२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी