कर्जत, दि. १२ जुलै २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशा समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होत नव्हता. त्या वर सुनंदा पवार यांनी प्रश्न ओळखून ग्रामीण भागातील महिलांना मास्क तयार करण्याचे काम दिले. त्यांच्या मार्फत आज पर्यंत ८५ हजार भास्कर तयार केले आहेत.
सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड मधील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. त्या मध्ये अॅग्रीकल्चरल डेवल्पमेंन्ट आणि मगर पट्टा नांदेड सीटी ग्रुप च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात ८५ हजार मास्क तयार केले. यामुळे कर्जत जामखेड महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.सध्याच्या परिस्थितीत महिलांना कोरोना मुळे रोजगार उपलब्ध होत आहे.
शासनाने मास्क अनिवार्य केल्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना मास्क बनवण्याचे काम दिले. २५० ते ३०० महिलांना रोज कच्चा माल पुरवला जातो. त्या पासुन मास्क तयार केले जातात. या बदल्यात महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यांना रोजचे ४०० ते ५०० रूपये मिळत आहेत. त्यामुळे महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. या मुळे महिला देखील आनंदी आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष