देशात एका दिवसात ८८ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात १९ वर पोहोचली आहे.
एका दिवसात देशभरात ८० नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत देशभरात ६९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आणखी ५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता ही संख्या १३० वर पोहोचली आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोना व्हायरसचा होणारा परिणाम लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आला असून लोकांनाही घराबाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे.
कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर लॉकडाउन वाढवला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा