सरकारवरील कर्जाबाबतच्या स्थितीदर्शक पत्रिकेची ९ वी आवृत्ती प्रसिद्ध

नवी दिल्ली, दि. २२ मे २०२०: सरकारवरील कर्जाबाबतच्या स्थितीदर्शक पत्रिकेची नववी आवृत्ती केन्द्र सरकारने आज प्रसिद्ध केली. भारत सरकारवर एकूण किती कर्ज आहे याबाबतची सविस्तर माहिती आणि विश्लेषण यात केले आहे. केन्द्र सरकार २०१०-११ वर्षापासून सरकारवरील कर्जाबाबत याप्रकारची स्थितीदर्शक पत्रिका प्रसिद्ध करीत आहे.

वर्षभरातील कर्ज व्यवहारांबाबत इत्यंभूत माहिती दिल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता राहाते. केंद्र सरकारची वर्ष २०१८-१९ मधील वित्तीय तूट, त्याबाबतचे आर्थिक व्यवहार याचा लेखाजोखा यात मांडला आहे.

कर्जावर परिणाम करणाऱ्या संवेदनशील घटकांची यात प्रामुख्याने नोंद घेतली आहे. उदाहरणार्थ कर्ज / जीडीपीचे प्रमाण, व्याजाचा भरणा, महसुल, कर्जाचे अल्पकालीन समभाग/ बाहेरील कर्ज/ एकूण कर्जासंबंधित FRBs याचा सविस्तर आढावा या पत्रिकेत घेतला आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ पर्यंत कर्ज व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. याचा केन्द्र सरकारला या काळातील नियोजनासाठी उपयोग होईल. ही स्थितीदर्शक पत्रिका वित्त मंत्रालयाचे संकेतस्थळ : https://dea.gov.in/public-debt-management वर उपलब्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा