गोल पोस्ट गुन्हा ९ वीच्या विद्यार्थिनीवर ८ दिवसांत १३ वेळा बलात्कार, आरोपी ताब्यात

९ वीच्या विद्यार्थिनीवर ८ दिवसांत १३ वेळा बलात्कार, आरोपी ताब्यात

छत्तीसगड (बलरामपुुुर), ८ डिसेंबर २०२०: आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी नववीतील एक विद्यार्थिनी घरच्यांना न सांगता गेली असता एका युवकानं तिला आपल्यासोबत नेहून तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्यानं तिला आपल्या ८ मित्रांच्या स्वाधीन केलं ज्यांनी त्या विद्यार्थिनीवर पुढचे काही दिवस बलात्कार केला. आरोपींमध्ये ६ अल्पवयीन मुलं आहेत. ही लाजीरवाणी घटना छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यातील आहे.

बलरामपूर जिल्ह्यातील राजपूर पोलिस स्टेशन भागात ९ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

२० नोव्हेंबर रोजी ती विद्यार्थिनी तिच्या घरातून अंबिकापूरला न सांगता तिच्या मैत्रिणींना भेटायला गेली होती तेथे तिची गांधीनगर पोलिस स्टेशन परिसरातील एका युवकाशी भेट झाली आणि ती त्याच्याबरोबर गेली. आरोपीनं पीडित मुलीवर काही दिवस बलात्कार केला आणि नंतर तिला त्याच्या मित्रांच्या स्वाधीन केलं. पीडित मुलीवर वेगवेगळ्या दिवशी ८ जणांनी बलात्कार केला. सतत होत असणाऱ्या अत्याचारानंतर या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाली आहे.

आपली मुलगी बेपत्ता झाल्यामुळं कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आसपासच्या आणि नातेवाईकांमध्ये मुलीचा बराच शोध घेण्यात आला परंतु ती कुठंही सापडली नाही. कंटाळून कुटुंबीयांनी मुलीच्या बेपत्ता झाल्याचा अहवाल पोलिसात दाखल केला. २० नोव्हेंबर रोजी तिच्या कुटुंबानं बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून राजपूर पोलिस स्टेशन गाठलं. याप्रकरणी राजपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता आणि पोलिस पथक त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी शोध घेत होतं.

दरम्यान, मुखबिरकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी अंबिकापूर जिल्हा सुरगुजा येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीची महिला पोलिसांकडून तक्रार नोंदवली गेली. अल्पवयीन मुलीनं तिच्या निवेदनात, १३ दिवसांत ८ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचं उघड केलं होतं. पोलिस पथकानं या घटनेतील सर्व आरोपींचा शोध घेऊन अटक केली आहे.

राजपूर पोलिस स्टेशन प्रभारी फरदीनंद कुजूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीतील २ आरोपी सज्ञान तर ६ अल्पवयीन आहेत. याप्रकरणी अपहरण कलमानंतर पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अ‍ॅक्टचा गुन्हादेखील दाखल केला. यासह पोलिसांनी आरोपींपैकी दोन आरोपींना न्यायालयात हजर केलं असता तेथून त्यांना न्यायालयीन रिमांडवर तुरूंगात पाठविण्यात आलं आहे, तर उर्वरित ६ अल्पवयीन मुलांना पोलिस कोर्टात हजर केलं जाईल व पुढील कारवाई केली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version