मोल्डो येथे भारत आणि चीन यांच्यातील ९ व्या फेरीतील चर्चा

27

नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२१: वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) ताणतणावाच्या दरम्यान मोल्डो येथे भारत आणि चीन यांच्यातील ९ व्या फेरीतील चर्चा काल दुपारी अडीच वाजेपर्यंत चालली. १५ तास चाललेल्या या बैठकीत तणाव कमी करण्यासाठी चर्चा झाली. ७८ दिवसांनंतर चीनबरोबर चर्चेची एक नवीन फेरी सुरू झाली आणि या संभाषणाच्या अगोदर एअरचिफ मार्शल यांनी चीनला सांगितले होते की, भारतालाही आक्रमक होणे माहित आहे.

विशेष म्हणजे पूर्व लडाखमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही बाजूंकडून सैन्य आणि शस्त्रास्त्रांची भारी तैनात करण्यात आली आहे. सीमेवर भारताने आर्टीलरी गन, बंदुका आणि सशस्त्र वाहने तैनात केली आहेत. दोन्ही देशांदरम्यान ८ फेऱ्या झाल्या आहेत, परंतु लडाखमधील तनाव अद्याप संपलेला नाही.

नो मॅन लँड बनवण्यावर जोर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ व्या फेरीतील बैठकीत असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे की, पँगोंग लेकच्या उत्तर भागातील किंगर एरियाला सध्या नो मॅन लँड बनविले जावे. यावेळी लडाखच्या खोऱ्यातील तापमान वजा ३० अंशांपर्यंत खाली गेले आहे. परंतु दोन्ही बाजूंकडून सैन्यात कोणतीही कपात झालेली नाही. हिवाळ्यामुळे सीमेवर शांतता आहे, पण तणाव अजूनही कायम आहे.

चीनने तोडला करार, सीमेवर सैनिकांची जमवाजमव

दरम्यान, चिनी सैन्याने एलएसी जवळच्या तणावग्रस्त भागात गुपचूप सैन्याची जमवाजमव केली आहे, तर चार महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमधी करार झाला होता. दोन्ही देश तणावग्रस्त आघाडीवर सैन्य जमवणार नाहीत, असे म्हटले जात होते. काही क्षेत्रात चीनच्या वाढती पावले लक्षात घेता भारताने यापूर्वीच खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख (आयएएफ) आरकेएस भदौरिया यांनी शनिवारी चीनचे नाव न घेता म्हटले की ते आक्रमक होऊ शकतात तर आपणही आक्रमक होऊ शकतो. एलएसीवर चीन आक्रमक होण्याच्या शक्यतेवर त्यांनी हे विधान केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:ईश्वर वाघमारे