शिवसेनेचे नाव बदलून ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून देशातील वातावरण तापले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी सर्व पक्षांवर जोरदार टीका केली.
यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयनराजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, मुंबईला असलेल्या शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यावर शिवसेनेने उत्तर दिले पाहिजे.
शिवरायांचे वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही.
सोयीप्रमाणे राजकारण करायचे ही काही जणांची लायकी आहे. आम्ही शिवसेना नावावर कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केले पाहिजे.
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी शिवसेनेसह सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा