मकरसंक्राती आणि तिचे महत्व…

मकर संक्रांत हिंदू संस्कृतीतील एकमेव सण आहे. जो दरवर्षी इंग्रजी कॅलंडरनुसार निश्चित तारखेला येतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात.

मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व
यंदाचा संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा बुधवार १५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते. यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जातात.
या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात.
तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते.

मकर संक्रांत का साजरी करतात? संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने येतो. हे भासमान भ्रमण मानले जाते. सूर्याची ही स्थिती अत्यंत शुभ आहे. धार्मिक दृष्टीकोनातून या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिदेव याच्यावर असलेली नाराजी सोडून आपल्या घरी येतो. म्हणूनच मकर संक्रांतीचा दिवस आनंद आणि समृद्धीने पूर्ण असतो.

तीळ आणि गूळ यांचे महत्त्व, संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे. म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू एकमेकांना दिले जातात.

पतंग का उडवतात? मकरसंक्रांतीला पतंग उडवणे आरोग्यास लाभदायक असते. तसेच सकाळच्या वेळेस पतंग उडवला तर ऊर्जा मिळते. यासोबत व्हिटॅमिन डी मिळते, ऊन्हामुळे आणि थंडीमुळे त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळते, असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या वेळीच ऋतुमध्ये परिवर्तन होते. शरद ऋतुचा प्रभाव कमी होऊन वसंत ऋतु सुरू होतो. या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्र लहान दिवस मोठा होत जातो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा