नगर: शहरात बेकायदेशीरपणे विक्री केल्या जात असलेल्या नायलॉन (चायना) मांजावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नायलॉन (चायना) मांजा जप्त करत १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्यात ५ तर तोफखाना पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने रविवारी रात्री बागडपट्टी परिसरात ही कारवाई केली.
मकरसक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक दुकानामध्ये कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन (चायना) मांजाची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती उपाधीक्षक मिटके यांना मिळाली होती.
बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री करणार्या दुकानदारांना पोलिसांनी नोटीस काढून विक्री करण्यास मनाई केली होती. दरम्यान, महापालिकेने आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे.