पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वाय’ ने मारली बाजी

पुणे: गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) गुरुवारी (ता.१६) सांगता झाली. सांगता समारंभावेळी या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त चित्रपटांची घोषणा करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाला गुरुवारी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला.

याच बरोबर आणखी एका मराठी चित्रपटाने बाजी वाडीकर आहे. ‘वाय’ या मराठी चित्रपटाने देखील या पुरस्कारांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटासाठी अजित वाडकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आली आहे. या चित्रपटांमधील अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडण्यात आले आहे तसेच नंदू माधव यांचाही यामध्ये समावेश आहे. याच बरोबर प्राजक्ता माळी, सुहास शिरसाट, ओमकार गोवर्धन यांनीही या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हा चित्रपट स्त्री भ्रूण हत्येवर बनवला आहे. मुलगा मुलगाही भेदभाववरून अर्भकांच्या होत असलेल्या हत्या व त्यासंबंधित गुन्ह्यावरती या चित्रपटाची कथा आधारित आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा