अक्षय गुंदेचा यांनी घेतली जैन धर्माची दिक्षा

अहमदनगर: येथील २१ वर्षीय अक्षय गुंदेचा यांनी आज सुरत (गुजरात) येथे जैन धर्माची दिक्षा घेतली.
दिक्षा घेतल्यानंतर अक्षय गुंदेचा यांचे आर्य यश विजयजी महाराज, असे नामकरण झाले.

आर्य यश विजयजी महाराज म्हणाले, बालवयातच धार्मिकतेची गोडी होती. प.पू.पद्मयशसुरीश्वरजी म.सा.,प.पू. अजितयशसुरीश्वरजी म.सा, पन्यास प्रवर संस्कारयशविजयजी म.सा., साध्वीजी वीरतीमालाश्रीजी म.सा., ऋजुमालाश्रीजी म.सा. यांच्या सान्निध्याचा त्यांना कृपाप्रसाद मिळाला.
या महान साधूसाध्वीजींच्या विचारांनी आपल्याला धार्मिकतेची अधिकच आवड निर्माण झाली. सांसारिक जीवनापेक्षा संयमी जीवनात अधिक निर्मळ आनंद आहे.

साधूसाध्वीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समर्पित होवून धर्म कार्य करणार असल्याचे आर्य यश विजयजी महाराज यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा