बारामती (प्रतिनिधी): सत्ताधाऱ्यांनी कारण नसताना माळेगावचा घास मोठा केला. इथुन पुढे माळेगांवला बाहेरच्या ऊसाशिवाय पर्याय नाहि. ३४०० रुपये दर सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. त्यापैकी २३४ रुपये अद्याप मिळालेले नाहि. पाच वर्षाची ५० रुपयांची ठेव मिळालेली नाहि. जवळपास २८४ रुपये देणे बाकी असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकी निमित्त आयोजित बारामती येथे कार्यकर्ता मेळाव्यात पवार म्हणाले, आजपर्यंतच्या राजकीय कार्यकाळात दोन वेळा माळेगांव कारखाना विरोधी विचारांच्या गटाकडे गेला.मात्र, त्याचा इतर निवडणुकीवर कोणताहि परीणाम झाला नाहि. मात्र, त्यामुळे देशात, राज्यात बदनामी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आपण पदांचा गैरवापर
करुन कधी कोणाला त्रास दिला नाहि, कोणीही पुढे होवुन याबाबत सांगावे. हे असे राजकारण फार काळ टीकत नाहि. माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ विरोध असताना देखील करण्यात आली. मात्र, अपेक्षित पध्दतीने कारखाना चालला नाहि.
कारखान्यात अनेक वेळा ऊसाचा रस वाया गेला. गेटकेन गाळपाला प्राधान्य देण्याच्या सत्ताधाºयांच्या निर्णयामुळे शेतकºयांचे गहु पिकाचे नुकसान झाले. मध्यंतरी निरा डावा कालव्याबाबत निर्णय झाला. त्यावेळी सत्ताधाºयांच्या विचाराचे सरकार असताना देखील सत्ताधाºयांनी लक्ष दिले
नाहि. निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी बरोबर चर्चा
केली. तसेच, काँग्रेस आणि शिवसेनेच्या लोकांबरोबर बोलणार आहे. त्यांचा
आग्रह नसेल, मात्र, त्यांचे ऐकण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. २ लाखांच्या पुढील,नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.मात्र, तो निर्णय घेताना राज्य सरकारला, विकासकामांवर परीणाम होणार नाहि,याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
माळेगावमध्ये सत्ताबदल झाल्यावर त्या काळात ८ ते ९ महिन्यात तीन तीन व्हाईसचेअरमन बदलण्यात आले. त्यांचे बहुमत होते,त्याबदद्ल टीकाटीपणी करण्याचा मला अधिकार नाहि. त्यांच्या विचारांचे संचालक त्यांच्यापासुन बाजुला गेल्यावर त्यांना अपात्र करण्यात आले. लोकशाहित हे बरोबर नाहि. त्यांच्या विचारांचे सहकारमंत्री होते,म्हणुन असे राजकारण करण्यात आले. आम्हीपण चार चार वेळा मुख्यमंत्रीपद पाहिलेली लोक आहोत.तसेच चारवेळा कस का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिल्याचे पवार म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्तविक केले. मदन देवकाते, योगेश जगताप, गुलाबराव
देवकाते, अनिल जगताप यांचे भाषण झाले. मेळाव्यासाठी विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती नीता बारवकर, किरण गुजर, संदीप जगताप,केशव जगताप,संजय भोसले, शौकत कोतवाल आदी
उपस्थित होते.