प्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे

कॅनडा : महाराणी एलिझाबेथ यांच्याशी झालेल्या एका समझोत्यानुसार प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराणे आणि परिवारातील ज्येष्ठत्व सोडल्यानंतर आता ‘रॉयल हायनेस’ ही उपाधीही नाकारली आहे.
दरम्यान, आता ते राजघराण्याच्या सदस्यांसाठी असलेल्या सार्वजनिक कोषाचाही वापर करणार नाहीत. आता कॅनडामध्ये त्यांना आपला खासगी वेळ शांततेत घालवता येणार आहे.
प्रिन्स हॅरी यांनी महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याशी एक आठवड्याच्या खासगी चर्चेनंतर राजघराणे सोडण्याचा निर्णय घेतला.
स्वतंत्र झाल्यानंतर हॅरी आपल्या पत्नी व ८ महिन्यांच्या मुलासोबत ब्रिटन व उत्तर अमेरिकेत स्वच्छंदी जीवन जगणार आहेत. अनेक महिने केलेला विचारविनिमय व गत आठवडय़ात केलेल्या चर्चेनंतर माझा नातू व त्याच्या पत्नीने एक मार्ग स्वीकारला. त्यांच्यावर गत २ वर्षांपासून नजर ठेवली जात होती. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार स्वतंत्र जीवन जगू देण्यास आम्ही समर्थन देत आहोत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा