मुंबई : ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या तुफानी यशानंतर आता अजय देवगण फुटबॉलचं ‘मैदान’ काबीज करणार आहे. अशी माहिती मिळत आहे. अजय आता फुटबॉलवर आधारित त्याचा आगामी चित्रपट येत आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे ‘मैदान’. या चित्रपटात अजय एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत असून त्या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन हिची बहीणही झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बोनी कपूर यांची निर्मिती असलेला ‘मैदान’ हा चित्रपट हिंदुस्थानमध्ये फुटबॉलची रुजुवात करणारे प्रशिक्षक अब्दुल सय्यद यांचा बायोपिक असणार आहे.
अब्दुल सय्यद हे १९५० पासून ते १९६३ पर्यंत हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. जानेवारीच्या अखेरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
या चित्रपटात यापूर्वी अभिनेत्री कीर्ती सुरेश झळकत असल्याची चर्चा होती.
मात्र, आता तिच्याऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी हिची वर्णी लागली आहे. ५० हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रियमणी झळकली आहे. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेली प्रियमणी ही अभिनेत्री विद्या बालन हिची चुलत बहीण आहे.
‘मैदान’ ची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणव जॉय सेनगुप्ता यांनी केली असून ‘बधाई हो बधाई’ फेम दिग्दर्शक अमित शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.