भाजप कार्यकर्त्यांमध्ये मटनावरून हाणामारी

झारखंड : झारखंडमधील जमशेदपुरमधील डीमना तलाव परिसरात भाजप नेत्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मटणावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. झारखंडमधील जमशेदपूरजवळी डिमना तलाव परिसरात ही घटना घडली.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप नेत्यांनी डिमना तलाव परिसरामध्ये एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याच सहलीला भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी मटणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश कुमार यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र ही विनंती झुगारत दोन्ही गटांनी एकमेकांची तुफान धुलाई केली.
तसेच डिमना तलाव परिसरातील सहलीवरून साकची येथे परतल्यानंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी हाताला लागेल ते उचलले आणि तुंबळ हाणामारी सुरु झाली. कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्यांद्वारे एकमेकांवर हल्ला चढवला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हाणामारीत नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
साकची विभागाचे अध्यक्ष ध्रुव मिश्रा, शंकर प्रसार, हेमंत साहू, अजय साहू, भाजपा युवा मोर्चाचे सोशल मिडिया प्रमुख माँटी अग्रवाल, सोनू गोस्वामी, सौरव सिंह आणि बाँके सिंह अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा