तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाटस ग्रामस्थांचे गाव बंद ठेऊन निषेध

26

दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस (ता. दौंड) गावच्या हद्दीत असलेल्या टोल प्लाझा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाहनधारक प्रवाशी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना (दि.२१) रोजी घडली होती. संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी व घटनेच्या निषेधार्थ पाटस ग्रामस्थांनी आज गुरूवार (दि.२३) रोजी सकाळ पासुनच गावं बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे.

हेमंत सोनवणे या तरुणाला टोलचे अधिकारी अजित सिंग व अन्य एकजण अशा दोघांनी बेदम मारहाण केली होती. या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी लेखी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
परंतु अद्याप गुन्हे दाखल न झाल्याने पाटस ग्रामस्थांनी आज (दि.२३) रोजी सकाळ पासुनच गाव बंद ठेवत आपला निषेध नोंदवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यवत पोलिसांनी पाटस व टोल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
टोल नाक्यावरील मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान (दि.२२) रोजी सायंकाळी यवत पोलीस ठाणे येथे पाटस ग्रामस्थांची दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी बैठक घेऊन गाव बंद न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा