पुण्यात तरुणीसोबत अनैसर्गिक कृत्य ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पुणे शहरात आयटी कंपनीत नोकरीसाठी आलेल्या तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करून घृणास्पद अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या प्रियकराला विमानतळ पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना घडली आहे.

प्रविण नदयालकर (वय २९) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना १६ नोव्हेबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही झारखंड येथून पुण्यात नोकरीसाठी आली होती. तर प्रविण हा नामांकित कंपनीत डाटा इंट्रीचे काम करत आहे. त्यानंतर मे २००९ मध्ये मुलीची प्रविणसोबतओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१९ यादिवशी प्रवीणने तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तरुणीने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा ९ डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रवीण पुन्हा पीडितेच्या घरी गेला. ‘मला तुझी माफी मागायची आहे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे तरुणीने प्रवीणला पोलिसात जाऊन तक्रार देण्याची धमकी दिली. त्याचा राग त्याला आल्यामुळे प्रवीणने बिअरची बाटली तरुणीच्या गुप्तांगात घातली.
पीडित मुलीचे आई-वडिल झारखंडमध्ये राहायला असल्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला. ते पुण्यात आल्यानंतर मुलीने तक्रार दिल्यानंतर प्रवीणविरुद्ध अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.