इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस वजन काटे अचुक असलेचा दाखला भरारी पथक निरीक्षक वैधमापन शास्ञ विभाग यांचे पथकाने दि.२३ रोजी दिला.
वैधमापन विभागाचे वजन मापे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे आदेशानुसार दि. २३ जानेवारी २०२० रोजी दुपारी भरारी पथकाने अचानक कर्मयोगीच्या ऊस वजन काटयांची तपासणी केली. सदर भरारी पथकामध्ये तहसिलदार सोनाली मेटकरी, वैधमापन निरीक्षक हमीद शेख, नायब तहसिलदार रविकांत बनसोडे, जे.प. साखर आयुक्त कार्यालयातील डी.एन.माळी, जे.प. श्रेणी १ पी.डी. सांगळे आणि तांञिक अधिकारी दीपक पवार यांचा समावेश होता.
संबंधित पथकातील प्रतिनिधींनी ऊसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असलेबाबत फिरत्या वाहनांव्दारे कसून तपासणी करुन पडताळणी केली. त्यावेळी कर्मयोगीचे सर्व ऊस वजन काटे अचूक असलेचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पडताळणी प्रमाणपञ कारखान्यास सादर केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांचे हित डोळयासमोर ठेवूनंच चालविले जाते. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारंच कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालविले जाते. ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील असलेला विश्वास हीच कर्मयोगी परिवारासाठी मोठी प्रेरणा असल्याचे कारखान्याचे वतीने कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धन पाटील व्हाईस चेअरमन पद्मा भोसले व संचालक मंडळ यांचे वतीने जाहीर करण्यात आले. सदर पडताळणीमुळे पुन्हा एकवेळ कर्मयोगी कारखान्याने सभासदांची, ऊस उत्पादक सभासदांची विश्वासार्हता जपणूक करीत असलेचे दाखवून दिले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक कार्यकारी संचालक . बाजीराव सुतार, मुख्य शेतकी अधिकारी जे.एस. शिंदे, वर्क्स मॅनेजर ए.सी. पोरे, ऊस पुरवठा अधिकारी के.एन. हिंगमिरे, केनयार्ड सुपरवायझर एस.जे. यादव, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी तसेच दत्ताञय बनसोडे, नवनाथ तोबरे व रविंद्र निकम हे शेतकरी यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ – कर्मयोगी ची वजनकाटे तपासणीसाठी उपस्थित भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी.