तो’ क्षण पाहून अंगावर काटा आला : शर्मिला ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युवा नेत्याची एन्ट्री झाली आहे.
अमित ठाकरे सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा होताच अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे याही भावूक झाल्या. ‘हा क्षण पाहून अंगावर काटा आला,’ अशी प्रतिक्रिया शर्मिला यांनी दिली.

मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग होणार असल्याची जोरदार चर्चा आधीपासूनच होती. अपेक्षेनुसार गुरुवारी तशी अधिकृत घोषणा झाली.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर युवा नेत्यांसमवेत व्यासपीठावर आलेल्या अमित यांनी तलवार उंचावून उपस्थितांना अभिवादन केले.
शर्मिला ठाकरे, बहीण उर्वशी व पत्नी मिताली या तिघीही हे संपूर्ण दृश्य पाहत होत्या. त्या तिघींना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत

यावेळी शर्मिला म्हणाल्या की, अमित यांच्यावर आलेल्या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना शर्मिला भावूक झाल्या. ‘आई म्हणून माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा अमितच्या सोबत कायम आहेत. आजच्या क्षणाची आम्ही सगळेच वाट पाहत होतो. आम्ही हे सर्व केवळ मीडियातच ऐकत होतो. कारण आम्हाला कुणीही याबद्दल आधी कल्पना दिली नव्हती.

पत्नी मिताली म्हणाल्या, ‘अमितची कुणाशीही तुलना करण्याची गरज नाही. त्याने समाजासाठी चांगले काम करणे जास्त महत्त्वाचे आहे. हा प्रसंग पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. खूप बर वाटले. त्यांच्या पुढील वाटचालीत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील.’

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा