डंपर-दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू

अहमदनगर : डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२६ ) दिल्ली दरवाजा परिसरातील मेहतर कॉलनी येथे घडली.
चालत्या ढंपरच्या मागच्या चाकाला धडक बसल्याने महिला स्कुटीसह रस्त्यावर फेकली गेली. त्यात महिलेच्या डोक्याला इजा झाली. अपघात होताच त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु त्यांना तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली दरवाजा परिसरातील रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्यांचे कामे पूर्ण होईपर्यंत जड वाहनांना प्रवेश देवू नये अशी मागणी नगरकरांकडून होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा