बारामतीत निर्भया पथकाचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन

बारामती: निर्भया पथकाने बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल मेखळी शाळेला भेट दिली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना निर्भया पथक म्हणजे काय, निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट, मुलींना सक्षम बनविणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, मुलांमध्ये पुरुषांमध्ये मुलींविषयी महिलांविषयी आदराची भावना निर्माण करणे, मुलींची महिलांची समाजामध्ये होणारी छेडछाड थांबविणे, मोबाईल फोनद्वारे जे काही गुन्हे घडतात ते गुन्हे दाखल करून सायबर क्राईम नुसार त्याचा जलदगतीने तपास करणे, बारामती विभागांमध्ये निर्भया पथक कशा पद्धतीने काम करीत आहे.
महिलांविषयक कायदे स्वसंरक्षण पॉक्सो अॅक्ट अज्ञानातून संगतीतून जर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याचा आपल्या आयुष्यावर ती होणारा परिणाम खाजगी सरकारी नोकरी मिळत नाही तसेच पासपोर्ट देखील मिळत नाही. चारित्र्य प्रमाणपत्र हे पोलीस स्टेशन देत असते. जर गुन्हा दाखल असेल तर त्यामध्ये तशी सविस्तर नोंद करण्यात येते. त्यामुळे आपल्या हातून भविष्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही. याची दक्षता घ्या आयुष्यातील आपल्या आईवडिलांचे शिक्षकांचे स्थान कुटुंबातील वातावरण सामाजिक जाणीव लहान मुलांवरील होणारे अत्याचार त्याबाबत पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे यांची उदाहरणांसहित माहिती देऊन आपलं रक्षण आपण स्वतः कसं करू शकतो.

आई व मुलगी यांच्यातील नाते वयात येणार्‍या मुलांबरोबर पालकांनी कसे वागावे त्यांच्याशी वागताना घ्यावयाची काळजी संगत आपण कोणाच्या सानिध्यात संगतीत आहोत त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम आई वडील सोडून कोणावरही विश्वास ठेवू नये, कोणी दिलेला खाऊ नये शाळेमध्ये जाताना-येताना एकटे एकटे न येता-जाता समूहाने यावे जावे स्वसंरक्षणासाठी पोहणे , कराटे, तसेच मिरचीपूड दप्तरात ठेवणे ओरडणे चावणे स्कूल बॅग पेन सायकलची चावी याचा आपण स्वसंरक्षणासाठी कसा वापर करू शकतो. तो कसा करावा.
आपली संस्कृती पुरुषप्रधान असली तरी कायदे महिलांच्या बाजूने आहेत त्यामुळे महिलांनी न भिता न घाबरता. बोलावे समोर यावे तक्रार द्यावी अन्याय सहन करू नये अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा फार मोठा दोषी असतो त्याच पद्धतीने व्यक्त व्हा जीव एवढा स्वस्त नाही तो कोणासाठी तरी द्यावा प्रत्येक प्रश्नाला उत्तर प्रत्येक संकटाचे समाधान हे असतं फक्त तुमची अडचण व्यक्त झालात बोललात तर आम्हाला समजेल त्यासाठी बोला व्यक्त व्हा वेळोवेळी निर्भया पथक स्थानिक पोलिस स्टेशन हेल्पलाइन नंबर १००/१०९१ यांची मदत घ्या असे आवाहन केले.निर्भया पथकातील अमृता भोईटे यांनी केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा