नागरिकत्व कायद्याविरोधात इसळक ग्रामपंचायतीत ठराव

18

अहमदनगर : सीएए, एनआरसी आदी मुद्यांवर इसळक (ता. नगर) येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत या कायद्याविरोधात ठराव घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी या कायदाबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाला याबाबत सहकार्य न करण्याचा निर्णय घेऊन असहकार आंदोलन छेडले आहे. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. रहिवाशी असल्याबाबत व नागरिकत्व असल्याचे सर्व पुरावे असताना देखील सामान्य जनतेने नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करून महादेव गवळी यांनी हा ठराव मांडला.
इसळक गावात आदिवासी जाती-जमाती, आणि इतर मागास व दुर्बल घटकांची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे.
तसेच अल्पशिक्षित समाज असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे मत महादेव गवळी यांनी व्यक्त केले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक व ग्रामसभेचे अध्यक्ष सुखदेव पाटील गेरंगे, सरपंच बाबासाहेब गेरंगे, उपसरपंच अमोल शिंदे, सदस्य योगेश गेरंगे, चंदू खामकर, माजी सरपंच संजय खामकर, तुकाराम गेरंगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा