पुणे: सध्या सायबर क्राईम ची प्रकरणे वाढत चालली आहेत. अगदी मोठ्या बँकांपासून ते मोबाईल युजर्स पर्यंत अनेक जणांनी याबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. अलीकडच्या काळात अनेक जणांचे व्हाट्सअप हॅक झाल्याची प्रकरणे समोर आली होती. लोकांच्या मनी वॉलेट मधून सुद्धा पैसे चोरण्याच्या घटना रोज समोर येत आहेत.
असे असतानाच एका न्यूज चॅनेल चे पोर्टल हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. न्यूज अनकट च्या पोर्टलवर सायबर अटॅक करण्यात आले. पत्रकारिता हा समाजातील चौथा स्तंभ मानला जातो. या माध्यमातून समाजाचे प्रबोधन तसेच समाजाला जागतिक घडामोडींशी जोडून ठेवण्याचे काम वर्तमानपत्र किंवा न्यूज चैनल करत असतात.
न्यूज अनकट पोर्टलच्या सुरक्षितेचा प्रश्न आल्यामुळे हे पोर्टल महिनाभरासाठी बंद ठेवण्यात आले होते. कारण समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट किंवा बातम्या या पोर्टलच्या माध्यमातून या हॅकर्स ने केले असते. या अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी व्यवस्थापकांकडून पोर्टल चे काम थांबवण्यात आले व सदर सुरक्षितेच्या दुरुस्तीचे काम करून घेण्यात आले. सध्या हे पोर्टल पूर्ववत करण्यात आले आहे व बातम्याही चालू करण्यात आल्या आहेत.