मुंबई : भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर म्हणजेच ७० वर्षात केवळ ५७ लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वतंत्र भारतात पहिली फाशी नथुराम गोडसेला देण्यात आली आहे.
भारतात दरवर्षी किमान १३० आरोपींना फाशीची शिक्षा सुनवीण्यात येते. परंतु अमंलबजावणी शून्य टक्क्यात आहे. या मागचे मुख्य कारण आहे माफी करिता चालणारी लांब प्रक्रिया त्यामुळे फाशीची शिक्षा देण्यात उशीर होतो.
■ धनंजय चॅटर्जी : धनंजय चॅटर्जी याचा पहिला नंबर आहे. हेतल पारिख या १४ वर्षीय मुलीचा बलात्कार आणि खुन असा आरोप चॅटर्जीवर होता. तब्बल १४ वर्ष तुरुंगात काढल्यावर कोलकताच्या तुरूंगात त्याला फासावर लटकविण्यात आले होते.
■ मोहमद अजमल अमीर कसाब : या आतंकवाद्याने २६/११ ला संपूर्ण मुंबईत खुनाचा नंगानाच चालविला होता. कसबला २१ नोव्हेंबर २०१२ ला येरवाडा पुणे येथे फाशी देण्यात आली.
■ अफजल गुरु : १३ डिसेंबर २००१ साली झालेला संसदेवरील हल्ल्याचा मास्टर माइंड अफजल गुरु होता. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी दिल्ली येथील तिहार जेलमध्ये अफजल गुरुला फाशी देण्यात आली.
■ याकुब मेमन : १९९३ मध्ये झालेल्या मुंबई येथील १३ बॉम्बब्लास्ट करिता पैसा पुरविणारा आणि मुख्य सूत्रधारापैकी एक याकुब मेमन हा होता. त्याला ३० जुलै २०१५ रोजी नागपूर येथे फाशी दिली.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ४ दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देणार असल्याचा निर्णय देण्यात आला असला तरी अद्यापही त्यांची फाशी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यानुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली प्रकरणे :
▪ उत्तर प्रदेश – ३१८
▪ महाराष्ट्र – १०९
▪ कर्नाटक – १०७
▪ बिहार – १०५
▪ मध्यप्रदेश – १०४ (हे सर्व प्रकरणे मागील दहा वर्षातील आहे.)