तबल्यावर आपल्या बोटांनी आणि हातांनी संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या पद्मश्री उस्ताद झाकीर हुसेन यांचा आज वाढदिवस. नुकतंच त्यांनी ६९व्या वर्षांत पदार्पण केलं.
झाकीर हे तबला उस्ताद ‘अल्ला रख्खा’ यांचे पूत्र. अल्ला रख्खा हे महाराष्ट्रातले असल्यामुळे झाकीर यांचं बालपण मुंबईत गेलं. झाकीर यांचं पूर्ण नाव झाकीर हुसेन कुरेशी असं आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून झाकीर यांनी वडिलांकडे पखवाज शिकायला सुरुवात केली. अल्ला रख्खा त्यांना पहाटे ३ वाजता उठवून रियाज करून घ्यायचे.
वयाच्या सातव्या वर्षी झाकीर यांनी पहिला परफॉर्मन्स दिला.अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी तबल्याच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली.
१९७३ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरिअल वर्ल्ड’ प्रदर्शित झाला होता. झाकीर हे बिल लाउ वैलचे ग्लोबल म्युझिक सुपरग्रुपचे तबला बीट साईंसचे संस्थापक सदस्य आहेत.
१९८८ मध्ये झाकीर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
१९९२ मध्ये द प्लॅनेट ड्रम आणि २००९ मध्ये ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी त्यांना दोन ग्रॅमी अवॉर्डही मिळाले. तर २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.