हिंजवडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांनि पकडले

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरातील आयटी पार्क येथील व्हाईट स्केअर मॉलमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्या व्यवसाय पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
याबाबत खबऱ्याकडून व्हाईट स्केअर मॉलमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर  त्या ठिकाणी पथकासह छापा मारला. त्यांनतर सदरील ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे लक्षात आले.
या छाप्यामध्ये विशाल मोहन आगरवाल (४०) रा. चिंचवड, वंदना अडागळे (३६) रा. कर्वेनगर यांना अटक करून पोलिसांनी तेथील १० मुलींची सुटका केली.
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा