नवी दिल्ली : कोरोनोमुळे जगभरातील उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोरोनामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ४४ हजार कोटी रूपयांची घट झाली आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाईमनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ११.०८ टक्क्यांची घट झाली असून ती आता ४२.२.अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
यामुळे मुकेश अंबानींना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिले स्थान गमवावे लागले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. कच्च्या तेलावरून सौदी अरेबिया आणि रशिया सध्या दरयुद्ध सुरू आहे.