इटली : सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूमुळे इटलीमध्ये एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इटली या देशाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती आता समोर येत आहे.
याबाबत पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी सर्व देशामध्ये शटडाऊनची म्हणजेच बंद करण्याची घोषणा केली आहे. महत्वाचा प्रवास वगळता इतर प्रवासांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या इशाऱ्यांकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने सरकारे सक्तीची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे इटलीतील दोन तृतीयांश भागातील सहा कोटी जनतेला घरी बसण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीय. याच पार्श्वभूमीवर “पॉर्न हब” या वेबसाईटने इटलीमध्ये आपला सबस्क्रीबशन मोफत देण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात कंपनीने एक पत्रकच जारी केलं आहे.
कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार, वेबसाईटवरील प्रिमियम कंटेंट इटलीमधून मोफत पाहता येणार आहे. अनेक लोकं करोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या बंदीमुळे घरातच असल्याने कंपनीने ३ एप्रिलपर्यंत मोफत कंटेंट देण्याचा निर्णय घेतल्याचे, एका वृत्त पत्राने म्हटलं आहे. केवळ कंटेटच नाही तर मॉडेल हब या आपल्या वेबसाईटच्या कमाईतील काही रक्कम कंपनी इटलीला मदत म्हणून देणार असल्याचेही कंपनीने म्हटलं आहे.
कंपनीने काढलेल्या या पत्रात म्हटलं आहे की,
“हॅलो इटली, आमचे तुमच्यावर भरपूर प्रेम आहे. आमच्या मॉडेल हब साईटवरील कमाईचा काही हिस्सा तुमच्या देशाला करोनाविरुद्ध लढण्यासाठी निधी म्हणून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच तुम्हाला घरी वेळ घालवता यावा म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या साईटवरील प्रिमियम कंटेंट मोफत देणार आहोत. त्यामुळे आता क्रेडिट कार्डवरुन तुम्हाला कंटेंट पाहण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही,” असं कंपनीने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.